Breaking News

प्राप्त परिस्थितीमध्ये यश संपादन करावे - जगधने


जामखेड तालुक्यातील नायगाव येथील पंचक्रोशी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था साताराच्या मॅनेजींग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तर विभागीय सल्लागार मडांळाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर होते. यावेळी बोलताना मिनाताई जगधने म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणास त्याची आर्थिक परिस्थिती येत नाही. प्राप्त परिस्थीत विद्यार्थ्याने यश संपादन करावे, असे प्रतिपादन केले. अध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले की, विद्यालयाच्या भौतिक विकासा पेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीकडे लक्ष शिक्षक, पालकांसह ग्रामस्थांनी द्यावे असेही म्हणाले. याकार्यक्रमाप्रसंगी स्थानिक सल्लागार कमेटीचे अध्यक्ष बाबासाहेब रामभाऊ उगले, कुटुंबीय स्वाती व सुनिल उगले यांनी विद्यालयासाठी कै. श्रीमती मुक्ताबाई तनपुरे यांच्या स्मरणार्थ 81 हजार रूपयांची देणगीचा धनादेश दिला. तसेच हेमंत उगले सेवा निवृत कुषि आधिकारी यांनी 51 हजार रूपयांचा धनादेश दिला. तसेच अशोक गिते यांनी देखील 1 हजार रूपयांचा धनादेश दिला. त्यांचे विद्यालयाने आभार मानले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर मॅनेजींग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, अ‍ॅड. नितिन गोलेकर जनरल बॉडी सदस्य र. शि. संस्था सातारा, सरंपच ग्रा. सदस्य, चेरमन, संचालक, ग्रामस्थ, शिक्षकांसह विद्यार्थी आदी उपस्थित होते.