Breaking News

खर्डाची कानिफनाथ यात्रा शांततापुर्ण वातावरणात


येथील कानिफनाथ यात्रा शांततेत पार पडली. शासकीय योजनेतून नागरिकांनी शौचालय बांधून घेण्याचे आवाहन खर्ड़ाचे सरंपच संजय गोपाळघरे यांनी यात्रेच्या निमित्ताने केले. दरवर्षी पेक्षा यावर्षी भावीकांची उपस्थिती अधिक होती. दुपारी 2 च्या दरम्यान काठीचा मान शंकर पाटील व मोरे यांना ठरल्याप्रमाणे त्यांचा मान या वर्षी होता. काठी शिखराला लावणे हा मान रघुनाथ गोलेकर पाटील यांना होता. यात्रेमध्ये हिंदू-मुस्लिम समाजाचे भक्त मंडळी मदिरांत एकत्रीत धार्मीक विधी करत वगुळ, शेरणी, मलीदा, प्रसाद वाटप करत होते. यात्रेमध्ये शांतता ठेवण्याकरिता भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे यांनी परिश्रम घेतले. यात्रेच्या दिवशी कानिफनाथांस सर्वप्रथम नारळ फोडण्याचा मान मा. सरपंच शिवाजी पाटील यांना होता. या सर्व प्रथा पूर्वीपासुन आल्यामुळे जोपासल्या जातात. याठिकाणी पि. आय. पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शातंता राखण्याकरिता अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांच्या सहकार्याने यात्रा शांततेत पार पडली