Breaking News

रिपाइं मराठा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी बालाजी राजेभोसले

नान्नज येथील बालाजी राजेभोसले यांची रिपाइं मराठा आघाडीच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. जामखेड तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राजेभोसले यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केली. बालाजी राजेभोसले यांची निवड नाशिकमधील शासकीय विश्रामगृह येथे झाली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व रिपाइंचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे यांनी राजेभोसले यांना पक्ष प्रवेश देऊन जामखेड तालुका रिपाइं मराठा आघाडीचे निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव अमर कसबे, नगर उत्तर जिल्हा अध्यक्ष दिपक गायकवाड, रिपाइंचे युवा नेते सतीश साळवे, नान्नजचे ग्रा. सदस्य बाळासाहेब कोळपकर, प्रफुल राजेभोसले, दिपक साळवे, आबा सोनवणे आदी उपस्थित होते. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विचारानुसार तळागाळातील गोरगरीब व दीन दलितांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणार असून माझी रिपाई मराठा आघाडीचे तालुकाध्यक्षपदी निवड केली मी तालुक्यात जास्तीत जास्त सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेऊन मी काम करणार तसेच रिपाई पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असे यावेळी राजेभोसले यांनी सांगितले. राजेभोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नान्नज या गावी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आले. नान्नज व परिसरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.