वारकरी संप्रदाय जपावा - दत्तात्रय काळे
संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी ही भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म, निती, व्यवहार व सामाजिक गुणदोष यांच्याविषयीचा मौलिक विचारांचा समुद्रच आहे. त्यांचे स्पष्ट परखड वेचक आणि तळमळीचे शब्द अंतःकरणाला सरळ भिडतात. मराठी मन महाराजांच्या वाणीला विसरले नसुन उत्तरोत्तर अभंगवाणी सामाजिक घटक बनली आहे. त्यांच्या विचारसरणीचा वारसा असलेला वारकरी संप्रदाय आपण जपावा असे प्रतिपादन दत्तात्रय महाराज काळे यांनी केले. भाविनिमगाव येथे आनंद साधक आश्रमात संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त आयोजित अभिवादन व भजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जगदंबा भजनी मंडळाचे गोरक्ष महाराज काळे, सिताराम महाराज चेडे, दत्तात्रय काळे, शंकरमामा घनवट, भानुदास शेळके, राजेंद्र राजगुरू, रंगनाथ गादे, कडूबाळ कुचे, चोपदार एकनाथ जगधने, बाबासाहेब चव्हाण, गोरक्ष शेळके, कांता जरे, नामदेव गादे, रामनाथ जरे, मा. सरपंच माणिकराव पाटील काळे, जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठाण अध्यक्ष संजय काळे, छायाचित्रकार संघाचे अध्यक्ष सोपान जाधव, पत्रकार शंकर मरकड आदींसह नागरीक उपस्थित होते. तुकाराम बिजेनिमित्त येथील जगदंबा माता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय काळे व मदन काळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.