वृक्ष दिनानिमित्त जैन कॉन्फरन्समार्फत वृक्षारोपण
जागतिक वन दिवसाच्या निमित्ताने जैन कॉन्फरन्समार्फत मोहा ता. जामखेड येथे वृक्षारोपन करण्यात आले.
जागतिक वन दिनाच्या निमित्ताने जैन कॉन्फरन्सचे कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामखेडचे तहसीलदार विजय भंडारी, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल ताथेड, समाजसेवक गणेश भळगट, नितीन सोळंकी, प्रफुलकुमार सोळंकी, वनपाल अशोक पठाडे, वनरक्षक सुधाकर घोडके, वनरक्षक विष्णू राठोड, ताहेर अली सय्यद, नितीन बांगर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना तहसीलदार विजय भंडारी म्हणाले की, मी बर्याच वर्षापासून संजय कोठारी यांचे समाजकार्य जवळून पाहत आहे. तसेच आज जैन कॉन्फरन्समार्फत वृक्षारोपण करण्याची इच्छा व्यक्त केली. कोठारी प्रतिष्ठाणमार्फत असे बरेच उपक्रम राबविण्यात येतात, असेही ते म्हणाले.
तसेच वनपाल पठाडे म्हणाले की, आम्हाला कोठारींचे नेहमीच मोलाचे सहकार्य असते. आज त्यांच्याबरोबर जैन कॉन्फरन्स मार्फत झाडे लावण्याचा उपक्रम उत्तम वाटला, झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आमचा हातभार लागला. या कार्यक्रमाचे आभार प्रफुल सोळंकी यांनी मानले.