सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवासाठी तरुणाई सरसावली यात्रेच्या अध्यक्षपदी चिंधे तर सचिवपदी शिंदे
संजय कुदन, शिवाजी शिंदे, बाळासाहेब वडितके, राजेंद्र गवळी, सचिन कडनोर, राष्ट्रवादीचे गणेश शिंदे, कळस समितीचे अध्यक्ष मछिंद्र चिंधे, शिवाजी चिधे, साहेबराव भोसले व रासपचे सुनिल चिंधे यांनी सर्व युवकांनी पुढाकार घेतला. प्रवरा बँकेचे माजी संचालक हनुमंत चिंधे व कृषि उत्पन्न समितीचे माजी उपसभापती अणासाहेब शिंदे यांनी राजकीय जोडे गावाच्या धार्मिक कामासाठी सोडून दिले. दोन्ही पार्टी एकत्र केल्या व दोन्ही विखे प्रेमी व कट्टर विरोधक हनुमान चिधे माजी संचालक प्रवरा बँक व अण्णासाहेब शिंदे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंत चिधे तर कॅशिअर अणासाहेब शिंदे यांची नेमणूक करण्यात आली.
यायात्रेत श्रीरामपूर परिसरासह नगर जिल्हा आणि राज्यभरातून येत असलेल्या नामंकित पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा भरतो. रंगपंचमीच्या दिवशी महादेवांच्या रथाची भव्य मिरवणूक, व शोभेची दारु बघण्यासाठी दूर दूरचे पाहुण्याची गर्दी होते. या यात्रेत सताधारी व विरोधी गट एकत्र येऊन यात्रा पार पडत आहे. त्यामुळे या यात्रेत रंगत वाढणार आहे.