कॉपीमुक्त अभियानास शेवगावमध्ये हडताळ !
मोठा गाजावाजा करीत राज्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे ठरवले. यातुन युवकांचे हिताचा व कल्याणाचा विचार करून हाती घेतलेल्या राज्यभर कॉपीमुक्त अभियानाचा गाजावाजा चालू आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा न घेता केवळ शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या सहाय्याने हे अभियान सुरू आहे.
या कॉपीमुक्त अभियानास मात्र शेवगाव तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर हडताळ निर्माण झाला आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व प्राथमिक विभाग या गोष्टींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करताना दिसत आहे. ज्या पद्धतीने कॉपीमुक्त अभियान पाथर्डीमध्ये राबवले गेले. ज्यापद्धतीने कॉपीमुक्त अभियान पाथर्डीमध्ये राबवताना सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या, त्याच पद्धतीने शेवगावमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेवगावमध्ये सर्वात जुने असलेल्या परीक्षा केंद्रावर आज यात्रेचे चिञ निर्माण झाली होते. अशाच पद्धतीचे चित्र शेवगांव, बोधेगाव, चापडगाव या ठिकाणीही निर्माण झाले आहे. एकंदरीत शेवगाव तालुक्यात दहावीच्या परिक्षेच्या कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडालेला दिसतोय. अपुरे फिरते भरारी पथक व पालकांची शिक्षकांची मिलीभगत यांमुळे अभियानात मोठ्या त्रुटी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांनी दहावीच्या परीक्षेसाठी भरारी पथकाची अपुरी नेमणूक केलेली जाणवते.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत त्या सुविधा अपुर्या असल्याचे जाणवते. काही दिवसापूर्वी उच्च माध्यमिक व माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी शेवगावला भेट देऊन तीन परीक्षा केंद्रांना परीक्षेसाठी केंद्र म्हणून मान्यता दिली होती. याठिकाणी असणार्या सुविधा पाहून ही मान्यता कशाच्या आधारे दिली गेली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मागील वर्षी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी बैठक घेऊन परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. परंतू आजच्या घडीला आपण जर पाहिले तर याहूनही अधिक प्रवेश परजिल्ह्यातील असल्याचे जाणवते. असेच चित्र जर कायम राहिले तर पाथर्डी सुधारत आहे, पण शेवगाव चे पाथर्डी तर होत नाही ना अशी भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.