विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे विद्यार्थ्यांनी परीसरातील साहित्य वापरुन नाविन्यपूर्ण प्रयोग केले. यामध्ये हवेचा दाब, पृष्ठीय तणाव, जडत्व, न्यूटनचे नियम यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे पडताळून पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला. विज्ञान जिज्ञासा, प्रश्नमंजुषेला बालवैज्ञानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
प्रास्ताविक विज्ञान शिक्षक अरुण तुपविहीरे यांनी केले. त्यांनी रामन परीणाम स्पष्ट करुन हा परिणाम 28 फेब्रुवारी 1928 रोजी डॉ. सी. व्ही. रामन यांनी मांडला यास भारताला पहीले विज्ञान नोबेल पारितोषिक मिळाले. अरुण तुपविहीरे यांनी विविध जादुचे प्रयोग करीत त्यामागील कार्यकारणभाव भाव स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी यास उस्फुर्त प्रतिसाद दिला. सुत्रसंचलन आकांक्षा तुपविहीरे व रश्मी पाटाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार बाळासाहेब डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक विजय अडकीत्ते, पर्यवेक्षक अण्णासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब शेडगे, सचिन सिन्नरकर, सुरेखा आढाव आदी उपस्थित होते.