श्रीराम जन्मोत्सवानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताहासह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
अळकुटी येथील वै. ह.भ.प. गेणभाऊ बाळाजी शिरोळे आणि वै. ह.भ.प. शामराव लक्ष्मण धोत्रे यांच्या प्रेरणेतून अळकुटी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन सोमवार दि.19 ते 26 मार्चपर्यंत आयोजन करण्यात आले.
यामध्ये पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर दैनंदिन कार्यक्रम असुन यामध्ये, प्रवचन व किर्तनकार म्हणून ह.भ.प. पोपट महाराज गुंजाळ शिरापुर, ह.भ.प. चैतन्य महाराज राठोड आळंदी, ह.भ.प. शिवाजी महाराज काळे सुपा, ह.भ.प. विलास महाराज वाघ आळंदी, ह.भ.प. राधिका काकडे पाबळ, ह.भ.प. जालिंदर महाराज नरवडे खातगांव टाकळी, ह.भ.प. राधाकृष्ण घुमरे अळकुटी, ह.भ.प. श्रीकृष्ण कृपाकिंत विकासानंद महाराज मिसाळ चास, ह.भ.प. मोतीराम कुंभार राजे तळेगांव ढमढेरे, वेंदाताचार्य ह.भ.प. सोपान महाराज निकम आळंदी, ह.भ.प. सुमंत महाराज हंबीर आळंदी पाटेठाण, ह.भ.प. प्रकाश महाराज बोंदले बीड, श्रीराम जन्मोत्सवानिमीत्त ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे जुन्नर, समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, काल्याचे किर्तन सोमवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 ह.भ.प. संजय महाराज कावळे आळंदी यांचे होईल. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम, काल्याचे किर्तनाचे अन्नदाते वै. ताराबाई शिरोळे यांच्या स्मरणार्थ, फुलाबाई शिरोळे व सुभाष आग्रे प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमीत्ताने दुपारी 12.30 वा. फलाहार व प्रसाद सुदाम शिरोळे, शरद शिरोळे यांच्याकडून आहे. चहापाणी, नाष्टा अशोक पिंगळे, हरिजागर साठी श्रीराम हरिपाठ भजनी मंडळ अळकुटी, गणेश भजनी मंडळ म्हस्केवाडी, संगमेश्वर भजनी मंडळ पाडळीआळे, मुक्ताई भजनी मंडळ चोंभुत, श्रीराम भजनी मंडळ अळकुटी, विठ्ठल रूख्मिनी भजनी मंडळ रांधे, जय हनुमान भजनी मंडळ अक्कलवाडी तसेच रोजच्या पंगतीचे अन्नदाते म्हणुन गाव ग्रामस्थांतर्फे अन्नदान करण्यात येत आहे. तरी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा अळकुटी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अळकुटी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.