… तर यशोशिखरावर पोहोचणे अत्यंत सोपे : काळे परीक्षेनंतर निरोपाचा पाडला नवा पायंडा
कोपरगाव ता. प्रतिनिधी - शिस्त व अभ्यासातील सातत्य या गोष्टींवरच उदयाचे उज्वल भविष्य घडणार आहे, याची जाणीव ठेवा. आतापर्यंत ज्या शिस्तीचे पालन केले तसेच जर यापुढेही तुमचे आचरण असेच राहिले तर आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचणे अत्यंत सोपे होईल, असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव चैताली काळे यांनी केले.
प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच निरोप देवून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या जातात. परंतु कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा नवा पायंडा पाडण्यात आला. यावर्षी प्रथमच इयत्ता १० वीच्या १३४ विद्यार्थ्यांना शेवटचा पेपर झाल्यानंतर निरोप देण्यात आला. परीक्षेपूर्वी निरोप दिल्यांनतर विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे काहीसे दुर्लक्ष होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केलेली तयारी व गुणवत्ता टिकून रहावी, या उद्देशातून निरोप समारंभाची आगळीवेगळी परंपरा गौतम पब्लिक स्कूलने सुरु केली. दरम्यान, या निरोप समारंभात विद्यार्थी अतिशय भावूक झाले होते. आम्ही १० ते १२ वर्ष ज्या शाळेत निवासी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले, त्या शाळेला निरोप देतांना आपण जीवापाड प्रेम करणा-या आपल्या परिवारापासून दूर जात असल्याची जाणीव होत आहे. शाळेने आमच्यावर केलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच भविष्यात मोठे यश संपादन करू, अशी ग्वाही या विद्याथ्यांनी याप्रसंगी दिली. एक शाळासुद्धा एका कुटुंबाप्रमाणे असू शकते, असा अनुभव गौतम पब्लिक स्कूल मध्ये आला असल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी प्रितीभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेचे विदयार्थी शेवटच्या दिवसापर्यंत शिस्त व अभ्यास याचे काटेकोरपणे पालन करतांना दिसल्याने पालकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण दिसले. अशा प्रकारे आगळा वेगळा निरोप दिल्याने शाळेतील सर्व मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला.