देशात सर्वांधिक तापमानाची नोंद अकोल्यात यंदा तापमानात वाढ होणार असल्याची हवामान खात्याची शक्यता
मुंबई : हवामान बदलाचा परिणाम भारताच्या बहुतांश भागात दिसत आहे. वेळेआधीच देशभरात उष्णतेने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे. शनिवारी महाराष्ट्रातील अकोला शहर देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. इथे सर्वोच्च तापमान 39.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोल्याशिवाय महाराष्ट्रातील ब्रह्मापुरी, जळगाव, परभणी आणि वर्धा इथेही 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारताच्या बर्यात भागांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलं. गुजरातपासून कर्नाटक पर्यंत दिवसाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला होता.
यंदा राज्यभरातील बहुतांश भागांत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडयापासूनच सुरू झालेली काहिली, मार्च महिन्यात आणखीनच वाढणार असल्याचे भाकित केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लोकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागणार आहे. यावेळी किनारपट्टी वगळता राज्याच्या अंतर्गत भागात उष्णतेच्या लाटांची तीव्रता सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात राज्यातील तापमानात नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षा 1 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून विदर्भातील कमाल तापमानात एक अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात कोकण वगळता इतरत्र म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे उष्णतेच्या लाटा येतील. सलग दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस सरासरी तापमानात पाच अंश से. पेक्षा जास्त वाढ झाली तर उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले जाते अशी माहिती नागपूपर हवामान विभागाचे संचालक ए. डी. ताठे यांनी दिली.