Breaking News

मूल्यसंवर्धन स्पर्धेत ‘आत्मा मालिक’ यश


कोपरगाव ता. प्रतिनिधी ;- आंतरराष्ट्रीय कृष्णाभावनामृत संघाच्यावतीने (इस्कॉन) आयोजित मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या शाळेतील विदयार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविले. 

श्रीमदभगवद्गीतेवर आधारित या परीक्षेतून विदयार्थ्यांना संस्कृती, कार्यक्षमता व चारित्र्याचे धडे मिळावेत, हा उद्देश आहे. सहभागी प्रत्येक विदयार्थ्यास भगवद्गीता देण्यात आली होती. यामध्ये पहिल्या स्तरावर अनिकेत कोथमिरे तर दुस-या स्तरावर साईराज कराळे हे विद्यार्थी जिल्हयामध्ये पहिले क्रमांकावर आले. या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू स्वरूपात थर्मास आणि सायकल देऊन गौरविण्यात आले. या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, किरण गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.