Breaking News

संजीवनी पाॅलीटेक्निकचा राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक


कोपरगांव: सजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अमित खेबडे व पवन जाधव यांनी संदीप अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिकने आयोजीत केलेल्या राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धेत ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) अॅण्ड इटस् फॅसिनेटींग अॅप्लीकेशनस इन स्मार्ट ग्रीड’ (स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञानात आयओटी चे उपयोग) या विषयावर शोध निबंध सादर करून देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधिल विद्यार्थी प्रतिस्पर्धी असताना देखिल प्रथम क्रमांक मिळवुन रू ११००० मोलाचे बक्षिस जिंकून संजीवनीतील पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी आधुनिक संशोधनाच्या वाटेवर कार्यरत असल्याचे सिध्द केले. अमित व पवन यांच्या या यशामुळे संजीवनी संशोधन क्षेत्रात विध्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकातद्वारे दिली आहे.