पोटनिवडणूकीसाठी बसपा-सपा एकत्र गोरखपूर व फुलपुर लोकसभेसाठी पोटनिवडणूक
लखनऊ/वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशात होऊ घातलेल्या पोटनिवडणूकांसाठी एकमेकांचे कट्टर स्पर्धंक समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष एकत्र येत असल्यामुळे या पोटनिवडणूकीत भाजपला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. गोरखपुर आणि फूलपुर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात लढण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी एकत्र आले आहेत. बसपा प्रमुख मायावती यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर या पोटनिवडणुकीत सपाला पाठिंबा देण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. भाजप विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणार्या गोरखपूरमध्ये पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. एकेकाळचे एकमेकांचे कडवे स्पर्धंक एकत्र येत असल्यामुळे राजकारणांत कोणीच कायम स्वरुपी कोणाचा मित्र वा शत्रु नसल्याचा या निमित्ताने प्रत्यय येत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फूलपुरमध्ये 11 मार्च रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपने विधानसभेच्या 403पैकी 300 जागांवर विजय मिळवला होता. लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत देखील भाजपचा विजय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी गेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास सपाला 28 टक्के तर बसपाला 22 टक्के मते मिळाली होती. हे दोन पक्ष एकत्र आले तर भाजपसाठी ही निवडणूक कठीण ठरू शकते. विधानसभा निवडणुकीत सपाचा मोठा पराभव झाला होता. तर बसपाला देखील मोठा दणका बसला होता. लोकसभा निवडणुकीत तर बसपाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळेच या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात बसपा आणि सपा एकत्र आले आहेत.