ठाणे परिवहनचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,इथोनोलवर चालणाऱ्या बसेसचा जास्तीत जास्त वापर करून शहर प्रदुर्षण मुक्त ठेवीत परिवहनने भरारी घेण्याची गरज आहेपरिवहन सेवेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असल्याचे सांगितले. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या सांभाळली.
परिवहन सदस्य आणि परिवहन प्रशासन यांच्या सहकार्यानेच परिवहन सेवेची घौडदौड केल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगत परिवहन समितीचे कौतुक यावेळी केले. परिवहन सेवेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमीत्त परिवहन सेवेत विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये शेखर शांताराम शिंपी,शिवाजी गोपीनाथ कुर्हाडे, विवेक पांडुरंग परब,दिलीप सुरेश देवकर,सुनील दामोदर ठाकरे, राजेंद्र विष्णू खोपडे, विलास श्रीधर सुकाळी,दिलीप आबा जुगदर,योगेश अरविंद पाठक,राजेश गणपत जाधव, मोहन मारुती पानसरे,प्रतिभा राहुल घाडगे आदी कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी 'कथुली’हे नाटक सादर केले. माधव साने लिहीत ‘कथुली’ या नाटकात आजच्या युगातील विठ्ठल रुक्मिणीची व्यथा मांडण्यात आली आहे. अभिनय कट्टयाचे कबीर शेख यांनी या नाटकाचे दिग्दर्शन यांनी केले असून अभिनय कट्टयाचे संचालक किरण नाक्ती यांच्या मार्गदर्शनखाली हे नाटक सादर करण्यात आले.. अतिभव्य नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, उत्कृष्ट पार्श्वसंगीत अशा सर्वच बाबतीत अव्वल असणाऱ्या या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली.परिवहन सेवेच्या २९ वर्धापनदिनाला परिवहन सेवेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.