Breaking News

सत्तेवर लाथ मारण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे धनजंय मुंडे यांचा शिवसेनेला टोला


जळगाव : मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे सेना केवळ घोषणा न करता सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेचे सत्तेच्या रुपाने तण निर्माण झाले आहे ते तण बळीराजाच्या नांगराने पूर्णपणे उध्वस्त करुया असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धरणगावच्या जाहीर सभेत केले.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बळीराजाचे प्रतिक नांगर देण्यात आला.तो नांगर उंचावून बळीराजाला अभिवादन करण्यात आले.याच नांगराचा मुद्दा पकडत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल शेवटचा दिवस असून धरणगावमध्ये 19 वी सभा प्रचंड प्रतिसादात पार पडली.
आमच्या हातात बळी राजाचा नांगर दिलात त्याचं पूजन ताईंने केले आणि आम्ही तो नांगर खांदयावर घेतला आहे. येणार्‍या काळात या राज्यामध्ये बळीचे राज्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवो अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सभेत आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये पुन्हा एकदा सरकारचे वाभाडे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी प्रधानमंत्री नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी घेऊन पळाले त्यातले काही चौकीदाराला मिळाले की काय? म्हणून ते यावर अजून काहीच बोलले नाहीत का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. हल्लाबोल यात्रेत एक जाणवले की लोक उस्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आता बोलत आहेत. आमच्या भाषणाचे एक वाक्य पुर्ण होण्याआधी दुसरं वाक्य लोकच बोलत आहेत. इतका प्रचंड विरोध याआधी आम्ही पाहीला नव्हता.भाजप, मोदी आणि त्यांची आश्‍वासने आता चौक ाचौकात चेष्टेचा विषय बनली असल्याचे ते म्हणाले. आज 84 लिटर पेट्रोल झाले पण आपल्याला महाग वाटत नाही. 19 पैशाने पेट्रोल - डिझेल कमी झाले तरी माध्यमं त्याची ब्रेकिंग न्युज करतात याची त्यांनी खंत व्यक्त केली.