Breaking News

मुंब्रा कब्रस्तानसाठी २२ फेब्रुवारी रोजी एमआयएमची जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा


ठाणे : प्रतिनिधी ;- मुंब्रा कब्रस्तानचा मुद्दा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असतानाच मुस्लिम बहुल परिसरात मागच्या ८ वर्षांपासून कब्रस्तानच्या आडोशाला मुस्लिमांची दिशाभूल करण्यात येत आहे. शासनाने देऊ केलेल्या भूखंडात बदल करीत स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांनी भूखंडावर भरणी सुरु केली आहे. मुस्लिम नागरिकांच्या फसवणुकीच्या निषेधार्थ २२ फेब्रुवारी रोजी एमआयएम द्वारा पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती एमआयएम नेता वसीम सैय्यद यांनी दिली.
अनेकवर्ष लोंबकळत पडलेल्या मुंब्रा कब्रस्तान प्रकरणात नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या जागेवरच कब्रस्तान बनविण्यात यावे. मात्र या जागेवर भरणी करीत बिल्डर लॉबीला फायदा व्हावा यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. मुस्लिमांसाठी शासनाने भूखंड उपलब्ध करून दिला . दरम्यान या फिरवाफिरवी आणि फसवणुकीच्या तक्रारी केल्यानंतरही कारवाई व दखलच न घेतल्याच्या निषेधार्थ एमआयएमद्वारा २२ फेब्रुवारी रोजी कब्रस्तानच्या मुद्द्यावर २२ फेब्रुवारी रोजी मुंब्रा-कौसा तलावपाळी येथून ११ किलोमीटर पदयात्रा करीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत नेण्यात येणार आहे. एमआयएमचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात येणार आहे. एमआयएमने दिलेल्या निवेदनात कब्रस्तान प्रकरणात फसवणुकीच्या समावेश असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनात एमआयएमचे नेते वसिम सैयद यांनी पोलीस आणि पालिका आयुक्ताकडे केली आहे.