Breaking News

साखर विश्व प्रतिष्ठानच्या सभासद नोंदणीला प्रारंभ: शेवाळे


भेंडा/प्रतिनिधी /- राज्यातील साखर कामगार व त्यांचे कुटूंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या साखर विश्व प्रतिष्ठानच्या सभासद नोंदणीला प्रारंभ झाला. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शेवाळे व सचिव अविनाश कुटे यांनी दिली.

राज्यातील साखर कामगारांसाठी घरकुल योजना, साखर रत्न पुरस्कार, साखर कामगार महासंमेलने, कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक व वसतिगृहाचे प्रश्न, कुटुंबांची आरोग्य योजना, कामगारांच्या पाल्यांसाठी रोजगार निर्मिती, व्यवसाय मार्गदर्शन यासाठी हे प्रतिष्ठान कार्य करणार आहे.