Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजाचे शासन जगासमोर आदर्श : गणेश गव्हाणे

भेन्डा /प्रतिनिधी /- छ. शिवाजी महाराजनी रयतेचे राज्य सांभाळण्याचे अभिवचन देऊन सर्वांना समान न्याय दिला. कोणत्याही जातीधर्माच्या महिलेवर अत्याचार होऊ दिला नाही. हाच आदर्श तरुण पिढीने घ्यावा. असे वक्तव्य गणेश गव्हाणेनी केले. 


नेवासा तालुक्यातील भेन्डा येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. तुकाराम मिसाळ यांचे हस्ते शिवप्रतिमेचे हार घालून पूजन करण्यात आले. त्यावेळेस अध्यक्षपदावरून गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी उपसरपंच भाऊसाहेब फुलारी ,डॉ शिवाजी अशोक काळे,बाळासाहेब वाघडंकर, मायकल गोरडे , पत्रकार नामदेव शिदे ,डॉ दिलीप यादव, ग् देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.