कर्जतकरांनी घेतला नरशार्दूल राजा संभाजी महानाट्याचा आस्वाद
तसेच दि .19 फेब्रुवारी 2018 रोजी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. शिवजन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य, न भूतो कदाचित भविष्यती, डोळ्यांचे पारणे फेडणारी, कर्जतच्या इतिहासात नवा ऊच्चांक प्रस्थापित करणारी, अलोट हजारोंची भव्य मिरवणूक निघाली. मिरवणूकीमध्ये गज पथक, आदिवासी नृत्य पथक, ढोल, ताशे, झांज, हलग्या, लेझीम, ब्रांस बँन्ड, सनई, चौघडे, तोफा, घोडे, भगवे फेटे, शिवकालाची साक्ष देणारे मर्दानी रांगडे खेळ करणारे चपळ वाघ व करड्या नजरेच्या रणरागीणी आणि असंख्य भगवे फडफडणारे झेंडे या मिरणुकीचे साक्षीदार झाले. याशिवाय मिरवणुकीचे चित्रीकरण पहिल्यांदाच ड्रोन कॅमेरा द्वारे केले गेले. असंख्य लोकांच्या काळजावर ही मिरवणूक जशीच्या तशी कायमची कोरली गेली आहे. खरोखरच, शिवजयंती मनामनात व घराघरात साजरी झाली. शिवजन्मोत्सव मिरवणूकीत रणसंग्रामाप्रमाणे सहभागी झालेले सर्व जातीधर्मातील नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवक, गेल्या कित्येक दिवसांपासून झटणारे ज्ञात-अज्ञात अनेकांनी शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान केले.