Breaking News

पोलिस आयुक्तांच्या चांगुलपणावर हावी होतोय खाकी दहशतवाद......

नाशिक/ प्रतिनिधी ;- पोलिस आणि नाशिककर यांच्यातील अंतर कमी होऊन कायदा सुव्यवस्था राखतांना पोलिसंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पोलिस आयुक्त डा.रविंद्र कुमार सिंगल सामाजिक उपक्रम राबविण्याची प्रत्येक संधी साधत असतांना दुसर्या बाजुला पोलिस आयुक्तालयातील काही अतिउत्साही मंडळींमुळे पोलिस आयुक्तालयाची प्रतिमा मलीन करणार्या घटनांनी शहराला वेढले आहे.पोलिस पेट्रोल पंपावर सेवा बजावणार्या खाकी आणि खासगी कर्मचार्यांची दहशत आणि शांततेच्या मार्गाने साजरी होत असलेल्या शिवजन्मोत्सवावर गुन्हा दाखल क रण्याचे कर्तव्य बजावून लावलेले गालबोट पोलिस आयुक्तांच्या समाजाभिमुख हेतूला अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरले आहे.


पोलीस पेट्रोल पंपावर काम करीत असलेले खाजगी कर्मचारी पेट्रोल भरण्यास येणार्या ग्राहकांशी उर्मटपणे वर्तन करतात.त्यांच्यावर देखरेख करणारे आन ड्यूटी पोलीस कर्मचारीही खाजगी कर्मचार्यांच्या उर्मट वार्तनाला बळ देतात.आज दि.21 फेब्रूवारी रोजी तर या उध्दट वर्तनाने भारतीय नारीचा जाहीर उध्दार करून एका महिला ग्राहकाची अत्यंत खालच्या पातळीवर अश्‍लाघ्य भाषेत अवहेलना केली,सदर घटनेचे साक्षीदार म्हणून पञकार आहेत.माञ सरकारी कामात अडथळा नको म्हणून तात्काळ या मंडळींनी पोलीस आयुक्तांचे स्वीय सहाय्यकांसह पोलिस कल्याण विभागाच्या पोलीस निरिक्षक श्रीमती निकम यांच्याशीही याबाबत चर्चा केली,या चर्चेतून चव्हाण नामक कर्मचार्याविषयी सातत्याने तक्रारी येत असल्याचा निष्कर्ष निघाला.या खाकी दहशतवादा संदर्भात तपशीलवार वृत्तांत उद्याच्या अंकात.....