माफी मागण्यासाठी सामर्थ्य लागते-ह.भ.प. जाधव.अहमदनगर जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी कीर्तनाचे आयोजन
मारणे ही गोष्ट सोपी आहे. एखाद्यास मारण्यासाठी, इजा करण्यासाठी सामर्थ्य लागत नाही. परंतु केलेल्या चुकीची माफी मागण्यासाठी सामर्थ्य लागते. हिंसा करण्यापेक्षा केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होणे व त्याची माफी मागणे हेच खरे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन ह.भ.प. लहु महाराज जाधव यांनी केले.
गुन्हेगारी प्रवृत्तीपासून वेगळे करणे हेच आमचे कर्तव्य कारागृहामधील बंदी यांमध्ये सुधारणा करणे व त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून वेगळे करणे हेच आमचे कर्तव्य असून कारागृहामध्ये त्यादृष्टीने कार्यक्रम , शिबिराचे आयोजन केले जाते. पुढेही अनेक शिबिरांचे व कार्यक्रमांच्या आयोजनाचे नियोजन केलेले आहे.- शामकांत शेडगे ( सिनियर जेलर, अहमदनगर जिल्हा कारागृह )
अहमदनगर येथील जिल्हा कारागृहामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून कारागृह प्रशासनातर्फे कैद्यांसाठी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या वेळी अरुण पवार (पोलीस अधीक्षक, गृह, पोलीस मुख्यालय), दशरथ हाटकर (राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय), लिगाडे (पोलीस निरीक्षक,मोटार वाहन विभाग), अधीक्षक एन.जी.सावंत, सिनियर जेलर शामकांत शेडगे, जेलर देविका बेडवाल, चीफ मेडिकल ऑफिसर संजय खंडागळे, वरिष्ठ लिपिक वसंत सपकाळ, लिपिक सादिक मुल्ला, मिश्रक क्रांती सोनमाळी,व कारागृह कर्मचारी उपस्थित होते.
कीर्तनामधून कैद्यांना उपदेश करण्यासाठी नम्र झाला भूतां/तेने कोंडिले अनंता ही ओवी घेतली होती. जाधव महाराजांनी कैद्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याच्या अनुशंघाने मार्गदर्शन केले. नम्रतेचे , अहिंसेचे जीवनातील महत्व यावेळी कैद्यांना सांगण्यात आले. जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांसाठी सदैव वेगवेगळे उपक्रम कारागृह प्रशासनातर्फे राबवण्यात येत असतात. सुधारणा व पुनर्वसन या उक्तीप्रमाणे कारागृहातील कैद्यांसाठी कार्य करण्यासाठी अधीक्षक सावंत, सिनियर जेलर शामकांत शेडगे प्रयत्नशील असतात.