Breaking News

पालक आणि शिक्षकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका: पुरुषोत्तम आठरे


पाथर्डी / प्रतिनिधी /- विद्यार्थ्यांनी पालकांच्या विश्वासाला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्काराचे भान ठेऊन स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. पालक आणि शिक्षकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता जीवनातील यशोशिखरे गाठा. यासाठी प्रचंड मेहनत व अभ्यासात सातत्य ठेवा, असे आवाहन पुरुषोत्तम आठरे यांनी केले.
ते श्रीक्षेत्र मढी येथील भैरवनाथ क्रीडा व समाजसेवा मंडळ अहमदनगर संचलित शिवतेज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप समारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक मुखेकर, माजी सरपंच भगवान मरकड, कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव सुधीर मरकड, दादासाहेब मरकड, विविध विकास सेवा संस्थेचे चेअरमन सुखदेव मरकड, विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड, भाऊसाहेब निमसे, फारूक शेख, प्राचार्य गौतम ढेकणे, गणेश मरकड, दशरथ मरकड यावेळी उपस्थित होते.

यावेळी बी.ई.एस.टी अ.नगर संस्थेचे अध्यक्ष अशोक मुखेकर बोलतांना म्हणाले की, ग्रामस्थांनी व पालकांनी टाकलेला विश्वास, शिक्षकांचा त्याग व सेवाव्रतामुळे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळातून देशपातळीवर झळकावलेली कामगिरी हेच शिवतेज विद्यालयाच्या यशाचे गमक आहे. कल्याणी मरकड, सुप्रिया मरकड, रेवणनाथ मरकड, बारावीतील वर्षा मरकड, ऋषिकेश मरकड, सुर्यकांत मरकड, कोमल मरकड आदि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षितिजा मरकड, सूत्रसंचालन कल्याणी मरकड तर आभार प्रदर्शन छाया मरकडने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुख्मिणी चव्हाण, गणेश खैरे, महेश कोलते, साईनाथ भिसे, संदीप मरकड, दिपाली वांढेकर, सुनिता शिंदे, राणी ससे, सुनिता लवांडे, अविनाश मरकड, मुकेश खरात आदि शिक्षकांनी अथक मोलाचे परिश्रम घेतले.