Breaking News

इमारतीचा कठडा कोसळला-मायलेकी जखमी 3 गाड्यांचे नुकसान


ठाणे : प्रतिनिधी  ;- ठाण्याच्या खारकर आळी परिसरात एनकेटी कोलेज जवळ असलेल्या न्यू केप्टन इमारतीच्या तिसऱ्या माळ्याच्या गेलेरीचा कठडा पडल्याची घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दीड वर्षाची चिमुरडी नेहा नितीन सपकाळे आणि २४ वर्षीय महिला कीर्ती नितीन सपकाळ या गंभीर जखमी झाली आणि तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली. महिलेला केसल मिल येथील खाजगी रॉयल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खारकर आळी, एनकेटी कोलेज जवळ असलेली तळ अधिक चार मळ्याची न्यू केप्टन इमारत आहे. या इमारतीत 27 प्लेट असून ती चाळीस वर्ष जुनी आहे. या इमारतीच्या तिसऱ्या माळ्याच्या गेलेरीचा कठडा बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोसळला. या इमारतीच्या खाली पार्किंग करण्यात आलेल्या दोन मारुती वेगेनर,एक टाटा कार यांच्यावर कठडा पडला. या तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या गाड्या जितु जैन यांच्या मालकीच्या आहेत. कठडा पडल्याने दीडवर्षाची चिमुरडी नेहा किरकोळ जखमी झाली तर 24 वर्षीय कीर्ती या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघी माय-लेकी आहेत. कीर्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाने इमारतीत राहणाऱ्या 8 परिवारांचे स्थलांतर केले. त्यांना तात्पुरत्या स्वरुपात निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली