मुंबईतील रस्ते अपघातात वर्षभरात 490 जणांचा मृत्यू
मुंबई : शहरातील वाहतुकीची समस्या ही मुंबईकरांसाठी डोकेदुखी बनलेली आहे. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईच्या रस्त्यांवर होणारे वाहतूक अपघात आणि त्यात मृत पावणार्या व्यक्तींच्या संख्येतील वाढ हा नक्कीच चिंतेचा विषय झाला आहे. गेल्यावर्षी 2016 प्रमाणे 2017 मध्ये रस्त्यावरील वाहन अपघातात होणार्या मृत्यूच्या संख्येत 5 टक्क् यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई शहरामध्ये 2016 रोजी झालेल्या वाहन अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा 2017 सालात घडलेल्या वाहन अपघातात मृत होणार्यांच्या संख्येत 5 टक्क्यांनी वाढ झालेली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई वाहतूक पोलीस विभागाने माहिती अधिकाराखाली दिली आहे. वाहतूक शाखेच्या रेकॉर्डनुसार, 1 जानेवरी ते डिसेंबर 2017 पर्यंत मुंबईतील रस्ते, वाहन अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच खराब रस्ते, खड्डे आणि चुकीच्या नियमांमुळे किती जणांचे बळी गेले. त्यावर प्रशासनाने काय क ारवाई किंवा बदल केले आहे, याबाबत माहिती विचारण्यात आली होती. या संदर्भात बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मुख्यालयाकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. यात मुंबई शहरामध्ये 1 जानेवरी ते डिसेंबर 2017 पर्यंत तब्बल 490 लोकांचा रस्ते, वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. 2016 मध्ये मुंबईतील रस्ते वाहतूक अपघातात हाच आकडा 467 होता. या वाढलेल्या अपघातांचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. आश्चर्य म्हणजे मुंबईतील रस्त्यांवरील वाढणार्या वाहन अपघातांवर प्रशासनाने काय क ारवाई किंवा बदल केले आहे. याची माहिती वाहतूक विभाग अभिलेखावर जतन केली जात नाही, अशी माहिती देण्यात आली.