Breaking News

महोत्सवाच्या माध्यमातून शेतीसंबधीचे तंत्रज्ञान एकाच छताखाली : पालकमंत्री फुंडकर जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचा समारोप

बुलडाणा, दि. 21: कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीसंबधीचे सर्व तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पश्‍चिम विदर्भातील हजारो शेतकर्यांनी या महोत्सवाला भेट देवून परिसंवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. भविष्यात सुद्धा शेतकर्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु, असे प्रतिपादन राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.


खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर 20 फेब्रुवारीपर्यंत सुरु असलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, नगराध्यक्षा श्रीमती अनिता डवरे, पंचायत समिती सभापती उर्मीलाताई गायकी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक, जिल्हा परिषद सदस्या मालुताई ज्ञानदेवराव मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्टॉलधारकांचे अभिनंदन करीत शेतकरी बांधवांचेही आभार मानले. उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गटनिहाय सत्कार करण्यात आला. यामध्ये शासकीय / निमशासकीय गटात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांच्या स्टॉलने प्रथम क्रमांक पटकावला तर उपसंचालक, सामाजिक वनिकरण बुलडाणा द्वितीय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी तृतीय क्रमांक पटकावला. व्यावसायिक निविष्ठा गटात प्रथम महिको सिड्स लिमिटेड जालना, अजित सिड्स लि. औरंगाबाद द्वितीय, नेटाफ्रेम ड्रिप इरिगेशन तृतीय पुरस्कार मिळाला. कृषी यांत्रिकी व प्रक्रिया गटात प्रथम क्रमांक जैन इरिगेशन जळगाव खांदेश, शेती क्रांती फुड मशिन द्वितीय क्रमांक व पीके व्ही अकोला तृतीय क्रमांक पटकावला आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुकुटपालन गटात प्रथम क्रमांक म.फुले कृषी विद्यापीठ राहुरी, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज हॅचरी पोल्ट्री अंडी केंद्र विहिगाव ता. खामगाव व तृतीय क्रमांक कृष्णा गोट फार्म यांनी पटकावला आहे. सेंद्रीय शेती, औषधी वनस्पती व प्रक्रीया गटात कृष्णा फार्मस गट मोताळा प्रथम, जय श्रीराम फार्मस गट वडी ता. नांदुरा द्वितीय तर कृषी समृद्धी महिला गट येऊलखेड यांनी तिसरी क्रमांक पटकावला आहे.
अन्न प्रक्रीया गटात प्रथम दुर्गामाता स्वयंसहायता बचतगट भेंडवळ यांनी प्रथम, तुषार महिला बचत गट द्वितीय तर ओमसाई महिला बचत गट पारोळा यांनी तृतीय क्रमांक पटक ावला आहे. अन्न पदार्थ दालन गटात प्रथम नवनिर्माण महिला स्वयंसहायता गट, द्वितीय यशस्वी महिला बचत गट, तृतीय राधाबाई महिला बचत गट यांनी पटकाविला आहे. कृषी यांत्रिकीकरण गटात प्रथम क्रमांक जॉऩ डियर ट्रॅक्टर व रामा ट्रॅक्टर चिखली यांनी, तर एस्कॉर्टस ट्रॅक्टर्स व फिरके ऑटोमोबाईल मलकापूर यांनी संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक, कॅप्टन ट ्रॅक्टर्स व भवानी ट्रॅक्टर्स खामगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.