Breaking News

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नवरदेवाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली उडी टाकून आत्महत्या

कोरेगाव, दि. 21 (प्रतिनिधी) : कोरेगाव येथे आज सकाळी सहाच्या सुमारास कोरेगाव-सातारा रस्त्यावर जुन्या ल्हासुर्णे फाट्यासमोर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गणेश विश्‍वासराव बर्गे (वय 31) या युवकाने उस वाहतूक करणार्‍या अज्ञात ट्रॅक्टरच्या दुसर्‍या ट्रॉलीच्या चाकाखाली उडी टाकून आत्महत्या केली असल्याचे घटनास्थळासमोर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरणातून स्पष्ट होत असल्याचा तर्क पोलिसांनी काढला. 


विवाहादिवशी सकाळी गणेश मॉर्निंग वॉकला जाणे व उसाच्या ट्रॉलीखाली उडी टाकून आत्महत्या करण्यापाठीमागील कारण काय आहे? हे कारण शोधण्याची जबाबदारी पोलीस दलावर येवून ठेपली आहे. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी गणेश विश्‍वासराव बर्गे या युवकाची शहरातील ग्रामदैवतांच्या देवदर्शनासाठी वरात काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी सहाच्या सुमारास ल्हासुर्णे फाट्यासमोर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गणेश याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडवून दिली होती. या भीषण घटनेची माहिती समजताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील लोकांकडून अपघाताबाबत मा हिती घेत आहेत. प्रारंभी हा अपघात की घातपात हे शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेने सकाळच्या वेळी फिरायला जाणार्‍या लोकांच्या सुर क्षिततेचा प्रश्‍न किती गंभीर बनला आहे, याचे हे एक जिवंत उदाहरण पहावयास मिळाले आहे. 
दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे पोलिसांना समजले. या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये काय धागेदोरे सापडतात का? याचा तपास पोलीस करत होते. प्राथमिक पाहणीमध्ये गणेश चालत येत असल्याचे सीसीटीव्ही फु टेजमध्ये दिसत होते. त्यानंतर त्याच्या विरूध्द दिशेने एसटी बस गेली. त्या पाठोपाठ एक उसाची वाहतूक करणार ट्रॅक्टर येत होता. त्या ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या होत्या. त्यापैकी मागील ट्रालीखाली गणेश याने उडी टाकून आत्महत्या केली असल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेश याने विवाहाच्या दिवशीच सकाळी आत्महत्या का केली असावी, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहिल्याने गणेशला आत्महत्येस प्रवृत्त करणारे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेची नोंद क ोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.