पाथर्डी /प्रतिनिधी/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या,( पुणे)१२वी परिक्षेला २१ फेब्रुवारीला सुरवात झाली असुन, पाथर्डी तालुक्यातुन साधारपणे ५,९३५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.तर इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी ५,७१६विद्यार्थी उपस्थित होते. १२वीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व कॉपीमुक्त करण्यासाठी यावर्षी प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली. प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल,तहसीलदार नामदेव पाटील,नायब तहसीलदार नेवसे, गटविकास अधिकारी जगदीश पालवे,विस्तार अधिकारी यांची भरारी पथके तर केंद्रप्रमुख, व एस. एस. ए. मधील कर्मचारी यांच्या बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे..बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपर अगदी सुरळीतपणे पार पडला. तर प्रत्येक केंद्रावर प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल,तहसीलदार नामदेव पाटील,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी स्वतः जातीने लक्ष्य घालत भेट दिली. तसेच शिक्षकांशी संवाद साधत परीक्षा केंद्रावर कुठलीही अडचण असेल तर लगेच संपर्क करावा असा सूचना दिल्या.
१२वी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी यावर्षी प्रशासनाची चोख व्यवस्था
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:59
Rating: 5