Breaking News

कुकडी सहकारी साखर कारखान्यावर शिवजयंती साजरी


श्रीगोंदा /प्रतिनिधी/- तालुक्यातील पिपंळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवार १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार राहुलदादा जगताप पा. व उपस्थितांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला. मानव हाच धर्म मानून त्यांनी संपुर्ण रयतेसाठी केलेले काम व कार्याची माहिती दिली. तसेच शिवजयंती निमीत्त कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २% इतक्या अत्यल्प व्याजदराने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातुन प्रती हेक्टरी रु. ८५,४००/- रूपयेचे मर्यादीत सवलतीच्या दराने ५ वर्षाचे परतफेडीच्या कालावधीसाठी ऊसाच्या ठिबकसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. ठिबक सिंचन योजनेचा जास्तीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केले. यावेळी कुकडी सह. कारखान्याचे कार्यकारी संचालक डि.एन.मरकड, शेतकी अधिकारी सुभाषराव कुताळ, कामगार युनिअन अध्यक्ष कल्याण पाटील जगताप, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक पोपटराव कोळसे, बंडोपंत धारकर, दिपक इंगळे, शिवाजी फराटे, सुनिल भोयटे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते