दखल - ताजमहाल ही कबरच!
ताजमहाल ही मुघल बादशाह शाहजहान यांची पत्नी मुमताज महल यांची कबरच असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं आग्रा न्यायालयात सादर केलं आहे. त्यामुळं ताजमहाल ही मुमताजची कबर आहे की शिवमंदीर या संदर्भात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. राजेश कुलश्रे यांनी स्थानिक न्यायालयात या संदर्भात खटला दाखल केला होता. या वेळी पुरातत्व विभागाच्या वतीनं अॅड. अंजनी शर्मा यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. मुमताज या बेगमच्या स्मृतीनिमित्त बादशहा शाहजहाननं ताजमहाल बांधल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ताजमहाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेला तेजोमहल असल्याचं सांगत जे काही पुरावे सादर करण्यात आले होते, ते सगळे काल्पनिक असल्याचं शर्मा यांनी न्यायालयात सांगितलं आहे.
ताजमहालचा कुठला भाग पर्यटकांसाठी खुला असावा व कुठला नसावा, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं याआधी आदेश दिले असल्याचा दाखला देत आता नव्यानं त्यावर विचार करण्याची गरज नसल्याचंही शर्मा यांनी नमूद केलं. पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांच्या सांगण्यानुसार हा सगळा वाद सुरू झाला, तो पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या पुस्तकापासून. ताजमहाल नव्हे तेजोमहल असं सांगत ओक यांनी ही वास्तू शिवमंदिर असल्याचा दावा केला व तो सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले; मात्र हे पुरावे काल्पनिक असल्याचा दावा पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी केला आहे. ओकांनी हे पुस्तक प्रकाशित केल्यापासून हा वाद सुरू असून राजकारणी आपल्या परीनं त्यात भर टाकत आले आहेत. त्यामुळंच आग्रा न्यायालयात अनेक खटले दाखल झाले असून ताजमहालचं मूळ शिवमंदिरात असल्याच्या याचिका करण्यात आल्या आहेत. शिवसेनाही ताजमहालजवळील दसरा घाटावर वरचेवर भगवान शंकराच्या आरतीचं आयोजन करते. हे हिंदू मंदिर असल्यामुळं ताज महालमध्ये नमाज पढण्यात येऊ नये, अशी मागणीही अनेक हिंदू संघटना वरचेवर करीत असतात. ताजमहालला शिवमंदिर घोषित करावं आणि सत्यच बघायचं असेल, तर या वास्तूचे बंद असलेले सगळे भाग खुले करावेत आणि जे दिसेल, त्याची नोंदणी करावी अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली होती. ताजमहाल ही ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू असून जगभरातून पर्यटक ती बघायला येत असतात. त्यामुळं ती अशा वादाचा विषय होऊ नये, अशी अपेक्षा ‘आग्रा टुरिस्ट वेलफेअर चेंबर’चे अध्यक्ष प्रल्हाद अगरवाल यांनी व्यक्त केली आहे. ताजमहाल भारताच्या इतिहासाचा भाग असून ते देशाचे एक प्रतीकही बनलं आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल हा कायम वादात सापडतो आहे. ताजमहाल हे हिंदूंचं मंदिर होतं, त्या ठिकाणी कबर बांधण्यात आली असा आरोप विनय कटियार यांनी केला होता. ताजमहोत्सव असो, की तेज महोत्सव; या दोहोंमध्ये काहीही फरक नाही. ताज महोत्सव होतो, आहे ही चांगली बाब आहे; मात्र ताजमहाल हिंदूंचं मंदिर होतं, जिथं नंतर कबर बांधली गेली असा आरोप कटियार यांनी केल्यामुळंही वाद झाला होता. एक वेळ अशी येईल की कोणता तरी सत्ताधारी आत असलेली कबर हटवेल आणि त्यानंतर त्या जागी फक्त मंदिर राहिल, असंही कटियार यांनी म्हटलं होतं. तेजमहाल हा आमचा वारसा आहे. तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आमचीच आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. ताजमहालाबद्दल भाजपमध्येच दोन मतप्रवाह दिसून आले. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला सर्वांत मोठा कलंक आहे, असं म्हटलं होतं. तसेच ताजमहालची निर्मिती करणार्या मुघल शासकांनी हिंदूंचा सर्वनाथ केला, अशीही टीका त्यांनी केली होती. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ताजमहाल हे ठिकाण पर्यटन स्थळांच्या यादीतून बाहेर काढलं होतं. त्यावरूनही वाद झाला होता. योगी सरकारनं तयार केलेल्या पर्यटन स्थळांच्या यादीत गंगा आरती आणि गोरखधाम मंदिर यांचा समावेश होता. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ताजमहाल भारताचा ऐतिहासिक वारसा आहे, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. कटियार यांनी ताजमहाल हे हिंदूंचं मंदिर होतं, तिथं नंतर कबर बांधण्यात आली असं म्हटलं होतं. संसदेत दिलेली माहिती आणि न्यायालयात घेतलेली भूमिका परस्पर सुंसगत असल्यानं आता तरी किमान या वादावर पडदा पडायला हरकत नसावी.