Breaking News

इंडिया बुल हौ.फायनान्स कंपनीला 4 कोटी ७४ लाख ५३ हजार ९६२ रुपयांचा चुना


ठाणे : प्रतिनिधी  :- आपण आर्यन स्टील एक्स्पोर्टर कंपनीचा भागीदार असून पैशाची आवश्यकता असल्याचे भासवून सहकार्याच्या प्लेटचे कागदपत्र ठेऊन तब्बल 4 कोटी ७४ लाख ५३ हजार ९६२ रुपयांचे कर्ज घेऊन ते भरलेच नाही. याप्रकरणी इंडिया बुल हौ. फायनान्स कंपनीचे मेनेजर शिवाजी बिचकर रा. कांदिवली यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात सहाजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नौपाडा पोलीस करीत आहे.
इंडिया बुल हौ. फायनान्स कंपनीचे वसुली मेनेजर बिचकर हे नौपाडा कार्यालयात असतात. त्यांच्याकडे आरोपी नरपत बोकाडिया , कल्पेश बोकाडिया , मंजुळा बोकाडिया रा. कुंभार वाडा, पाठक स्ट्रीट मुंबई, राजेश, राखी मेवावाला रा. परेल, मुंबई यांनी हे कर्ज घेतले. राजेश यांच्या परेल येथील प्लेटचे कागदपत्र फायनान्स कंपनीत ठेवून 4 कोटी ७४ लाख ५३ हजार ९६२ इतके कर्ज घेतले v त्याचा परतावा केला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिचकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.