Breaking News

कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभार बाबत ग्रामस्थांचे निवेदन


पारनेर/प्रतिनिधी /- पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा बाबतीत ग्रामस्थांनी निवेदन दिले. येथील पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागातील कर्मचारी वेळेवर हजर नसतात.त्यांच्या मनमानी कारभाराविषयी दलित महासंघ व पारनेर ग्रामस्थाच्या वतीने विस्तार अधिकारी मेंगाळ यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास साळवे व भाउसाहेब खेडेकर यांनी नेतृत्व केले.
या निवेदनात म्हटले आहे की ,पारनेर पंचायत समिती मधील कर्मचारी हे कामावर येताना कधीही येतात.व कधीही घरी जातात. सरकारी कामाच्या कोणत्याही वेळा पाळल्या जात नाही. सदर या कार्यालयात बायोमेट्रिक पध्दत ठेवली असुन या यंञणेचा कर्मचारी कुठलाही वापर करत नाही. त्यामुळे अधिका-यांचे कर्मचाऱ्यांवर नियंञण राहत नाही. त्यामुळे बायोमेट्रीक पध्दत कार्यन्वित करण्यात यावी. तसेच पंचायत समितीत सर्व सामान्यांचे कुठलेही काम वेळेवर होत नाही. त्यामुळे सर्व सामान्यांना मोठा मानसिक ञास सहन करावा लागत आहे. आमच्या मागण्यांचा प्रशासनाने गंभीरता पूर्वक विचार न केल्यास कोणत्याही क्षणी कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, तहसिलदार,पोलिस निरिक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर भानुदास साळवे, अंकुश राक्षे, भाउसाहेब खेडेकर, संजय नाना अंबुले, संतोष रावसाहेब दिघे, कोंडीबा गणपत साळवे, रवि बाबुराव साठे, मनोज तामखडे, तुषार बाबासाहेब औटी, धिरज महांडुळे, सागर वैदय आदिंच्या सह्या आहेत