विणा पुजनाने गणपती चौफुला सप्ताहास उत्साहात प्रारंभ
पारनेर / प्रतिनिधी/- तालुक्यातील कान्हुर पठार पारनेर रोडवरील गणपती चौफुला विरोली येथील गणपती मंदिरात २८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास ह.भ.प. भगवान महाराज ढवळे व ग्रामसेवक संघटनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष संजय मते यांच्या हस्ते विनापुजनाने भावपुर्ण शुभारंभ करण्यात आला .
वै .हभप नाना महाराज वनकुटेकर यांच्या प्रेरणेने सुरवात झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार जनार्धन साळवे , गंगाधर गाडगे, धनंजय गोरडे , पोपट बोरूडे, रविद्र मते, नामदेव घाडगे, भर्तरी भागवत, भगवान ढवळे, सुधाकर आहेर, किशोर कुलकर्णी, ज्ञानेश्वर खराडे, सचिन चकवे, प्रा. नवनाथ माशेरे, डॉ विकासानंद मिसाळ, बाळकृष्ण कांबळे, किर्तनकार यांच्या माध्यमातुन ज्ञानदान होणार आहे. या दरम्यान रविवार ता. २५ रोजी सायंकाळी ७ ते ८.३० गणपती चौफुला जिं. प. शाळेच्या विधार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर सोमवार ता.२६ रोजी ६ ते ७ भव्य कलश मिरवणुक निघणार आहे. तरी भाविकानी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.