कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी
भाजपचे किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष बळीराम बोडखे यांनी सांगीतले की सध्या बदलत्या हवामानामुळे विहिरी व बोरचे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे लिंबू, डाळिंब, या बागांना पाणी कमी पडू लागल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाबाबत तातडीने बैठक घेऊन आवर्तनाचा निर्णय घ्यावा. पाण्याअभावी जळण्याचा मार्गावर असलेल्या फळबागा वाचवाव्यात अशी मागणी बोडखे यांनी केली आहे.
आवर्तनाची गरजच : बोडखे
कुकडीच्या आवर्तनाची सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण उभ्या फळबागा पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तातडीने कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी बळीराम बोडखे यांनी केली आहे