Breaking News

ठेकेदाराचा बनाव उघड. आठ लाख लुटल्याची दिली खोटी फिर्याद


ठाणे : प्रतिनिधी ;- व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने, मजुरांच्या पगारासाठी मिळालेल्या 8 लाख रुपयाची रक्कम देणेदारांना दिले. पैशाचा हिशोब दाखवण्यासाठी मजूर ठेकेदार महम्मद जमशेद शेख याने चक्क लुटीची खोटी तक्रार दाखल केली. मात्र तपासातील विसंगतीने गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-५ च्या पथकाने ठेकेदाराचा बनाव उघड करण्यात यश मिळवले, आणि फिर्यादी शेख याला कोठडीत टाकले.
17 फेब्रुवारी, 2018 रोजी आरोपी ठ्केदार महम्मद जमशेद शेख हे बँकेतून आठ लाखाची रक्कम मजुरांना पगार देण्यासाठी गोवंडी येथे निघाले असता, ही रक्कम दुचाकीस्वार चौकडीने लुटल्याचा बनाव रचला होता. धक्काबुक्की करून आठ लाखाच्या रक्कमेची लुट केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात नोंदविला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही आणि आरोपी शेखची जबानी यात विसंगती आढळल्याने फिर्यादी शेख याची कसून चौकशी करताच सत्य बाहेर आले. त्याला झालेल्या 20 लाखाचे कर्ज देण्यासाठी मजुरांच्या पगाराचे पैसे वापरल्याची कबुली आरोपी शेख दिली.