Breaking News

भीमा-कोरेगाव हिंसाचारावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून अनोखे फटकारे

मुंबई, दि. 28, जानेवारी - केंद्र, राज्य सरकार व शिवसेनेविरोधात व्यंगचित्रे काढून टीका करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराबाबत व्यंगचित्र रेखाटले आहे. हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबूकवरील अधिकृत पेजवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे.


या व्यंगचित्राच्या माध्यमातून सध्या राजकीय नेते कसे जाती-जातींमध्ये विभागले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला आहे. या व्यंगचित्रासोबत कॅप्शन म्हणून ॠफटक ारे’ असेही लिहिले आहे. यात पुढे मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यात अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता. सध्याच्या सरकारचे कर्तृत्वच असे की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही. 9 जानेवारी 2018 च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं ’अनुशेष’ शिल्लक ठेवणार्‍यातला मी नाही. 19 जानेवारीला ’हजयात्रेच्या अनुदानावरचं’ किंवा 23 जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र पाहिलं असेलच. पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत. त्यातलेच काही माझे ’फटकारे’. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.