Breaking News

1 हजार 525 बाईकर्सनी रॅलीद्वारे केली स्वच्छ नवी मुंबईसाठी जनजागृती

नवी मुंबई, दि. 28, जानेवारी - ‘स्वच्छ नवी मुंबई - सुंदर नवी मुंबई’ चा संदेश घेऊन 1525 बाईकर्स दिघा जवळील ऐरोली पटनी ग्राऊंडपासून सी.बी.डी. बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाजवळून करावे नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल ग्राऊंड पर्यंत धावले आणि भारतीय प्रजासत्ताक दिनी देशप्रेमाप्रमाणेच स्वच्छ नवी मुंबईचा संदेश संपूर्ण नवी मुंबई शहरात प्रसारित केला.


या रॅलीच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लिम्का बुक मध्ये नुकतीच नोंद झालेल्या विद्यार्थ्यांच्या विक्रमी वा ॅकेथॉन प्रमाणेच आणखी एक जागतिक विक्रम क्रुझ इंडिया यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या या बाईक रॅलीव्दारे प्रस्थापित होत आहे. ‘गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर’ मणी मंजुनाथन यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या रॅलीच्या सांगता समारंभ प्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासोबत उपस्थित बाईकर्स व मान्यवरांसह नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली आणि आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेत देशात नंबर वन वर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बाईक रॅलीचे कर्णधार ‘गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर’ मणी मंजुनाथन व असेच जागतिक विक्रमवीर पवित्र पात्रो तसेच बाईकवर विश्‍वभ्रमण करणारे बाईकस्वार भारव्दाज देयाला यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी शारी रिक कमतरतेवर मात करीत स्वयंस्फुर्तीने बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले विविध राज्यांमध्ये जाऊन 110 वेळा रक्तदान करणारे प्रकाश नाडर यांचा मंचावरून उतरून महापौर व मान्यवरांनी सन्मान केला, 
ऐरोली आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते, उपमहापौर . मंदाकिनी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐरोलीतील पटनी ग्राऊंडपासून सुरू झालेली ही विक्रमी बाईक रॅली दिवा क ोळीवाडा चौक, राबाडेगांव, तळवलीगांव मार्गे घणसोली एन.एम.एम.टी. डेपो समोरून कोपरखैरणे तीन टाकी मार्गे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर पासून पामबीच मार्गाने महापालिका मुख्यालायापर्यंत येऊन पुढे गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान, करावे तलावाजवळ नेरूळ याठिकाणी या रॅलीची सांगता झाली. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणा-या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये मागील वर्षीचे देशातील आठवे मानांकन यावर्षी नंबर वन करण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई शहर सज्ज झाले असून लोकप्रतिनिधींप्रमाणेच नागरिकांचाही उत्स्फुर्त सहभाग लाभत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘क्रूझ इंडिया’ या संस्थेच्या सहयोगाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1525 बाईकर्सनी रितसर नोंद करून सहभागी होत दिघा ते सीबीडी बेलापूर स्वच्छतेचा संदेश प्रसारित केलाव गिनीज बुक मध्ये विक्रमी नोंद केली.
यावेळी पटनी ग्राऊंडमध्ये आपल्या मोटर सायकल एका विशिष्ट पध्दतीने उभ्या करून तयार केलेली बाईकची प्रतिकृती तसेच गणपतशेठ तांडेल मैदानात याच पध्दतीने तयार के लेली स्वच्छ भारत अभियानच्या चष्म्याच्या बोधचिन्हाची प्रतिकृती लक्षवेधी होती.