Breaking News

बेलापुरातील जळीतग्रस्त कुटुंबाला चैतन्य उद्योग समुहाकडून मदत

रामपुर तालुक्यातील बेलापुर येथील तीन घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रूपयांचे नुकसान होऊन संसार उघड़यावर आला असता, या कुटुंबाला चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्यावतीने आर्थिक मदत व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.


बेलापुर खुर्द येथील मराठी शाळेजवळ राहात असलेल्या गोरक्षनाथ थोरात, सावळेराम थोरात, साहेबराव थोरात यांच्या घराला शुक्रवारी अचानक आग लागली. या आगेत घरातील संसारउपयोगी साहित्य, किराणा माल, कपड़े व अन्य सर्व साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझविन्यासाठी अथक परिश्रम घेतल्याने जीवितहानी टळली. 

दरम्यान चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी काल दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन पाहनी केली. यावेळी भांड यांनी तीनही कुटुंबियांना आर्थिक मदत व संसारपयोगी साहित्य देऊन कुटुंबाना आधार दिला. यावेळी राहुरी कारखान्याचे मा. संचालक द्वारकानाथ बडदे, आरपीआय तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात, अ‍ॅड. दीपक बारहाते, बाबासाहेब शेलार, अशोक शेलार, विलास भालेराव, श्रीकांत जाधव, शरद पुजारी, सुधा कदम, अतुल कापसे उपस्थित होते.उघड़यावर आलेला संसार सुरळीत सुरु व्हावा यासाठी सर्वप्रथम गणेश भांड यांनी पुढाकार घेऊन आधार दिल्याने थोरात कुटुंबातील महिलांनी समाधान व्यक्त केले.