Breaking News

शेतकरी उन्नत आणि समृध्द बनविण्याची जबाबदारी कृषि शास्त्रज्ञांवर ः कुलगुरू विश्‍वनाथा

26 जोने. 1950 साली देशाची नवी राज्य घटना संमत होऊन अमलात आली. या दिवशी खर्‍या अर्थाने आपला देश प्रजासत्ताक झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही राज्य घटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. संशोधनात मागील वर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे 11 वाण, तीन अवजारे आणि 69 शिफारशी शेतकर्‍यांसाठी प्रसारीत केल्या. कृषि तंत्रज्ञानाच्या प्रभावी विस्तारासाठी राज्यात प्रथमच फार्मस् फर्स्ट हा प्रकल्प आपण राबवित आहोत. शेतकर्‍यांच्या शाश्‍वत आणि दुप्पट उत्पन्नासाठी विद्यापीठाने एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल विकसीत केले असल्याचे प्रतिपादन प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहनप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांनी केले. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 69 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झाला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमास अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. दिलीप पवार, विजय कोते, मिलिंद ढोके, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी केले तर डॉ. राजेंद्र केंघे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा रूग्णालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कुलगुरुच्या हस्ते विविध बांधकामांचे उद्घाटन करण्यात आले.