Breaking News

तालुक्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात


शेवगाव /ता. प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहर व तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ तहसीलदार दीपक पाटील यांच्या हस्ते पार पडला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या परीक्षा निकालात राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या तालुक्यातील चैतन्य मुरदारे या माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्याचा तहसीलदार पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, शेवगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या हस्ते आदर्श विद्या मंदिरात पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पा. लांडे यांच्या हस्ते रोटरीचे अध्यक्ष डॉ. भागनाथ काटे, रविराज गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समिती सभापती संजय कोळगे यांच्या हस्ते, खरेदी विक्री संघ कार्यालयात चेअरमन विकास घोरतळे, न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांच्या हस्ते तर शेवगाव पंचायत समिती मध्ये तालुक्यातील खानापूर येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक कै. बाबुराव मोरे यांच्या पत्नी लक्ष्मी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले यांच्या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनी दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाच्या हस्ते ध्वजारोहनाचा नाविन्य पूर्वक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाऊसाहेब गोरे, सुभाष देशमुख, नवनाथ भापकर, साहेबराव वावरे, भारत पाडळे, बाबूलाल बैरागी आदींचा पंचायत समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.