ठाणे, दि. 28, जानेवारी - दक्षिण कोकणची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सवाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच लक्ष लागलेले असते. या यात्रेसाठी आ. सुभाष भोईर यांच्यावतीने कल्याण ग्रामीण मतदार संघातील नागरिकांसाठी दिवा ते आंगणेवाडी बस सेवा उपलब्ध करण्यात आली. या बसचा शुभारंभ युवा सेनेचे कळवा मुंब्रा अधिकारी सुमित भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अनेक शिवसैनिक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. सुभाष भोईर यांच्यातर्फे दिवा ते आंगणेवाडी बस सेवा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:15
Rating: 5