Breaking News

शाळेतील उपक्रम पाहून भारावून गेलो ः कोठारी


जामखेड /ता. प्रतिनिधी :-  27 जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा दत्तवाडी येथील उपक्रम पाहून अक्षरशः भारावून गेल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी प्रजासत्ताकदिनी आयोजित शालेय ध्वजारोहन समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते, पुढे म्हणाले की आजपर्यंत इतकी उपक्रमशील शाळा माझ्या पाहण्यात आलेली नाही. येथील विद्यार्थ्यांनी वर्क्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, वैयक्तिक गायन, वेशभूषा, कुस्ती, योगासने, बुद्धिबळ, चित्रकला, शिष्यवृत्ती, सांस्कृतिक, समूहगीत गायन, पाठांतर, गोष्ट कथा सादरीकरण इ. स्पर्धेत केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर मिळवलेले घवघवीत यश शाळेच्या गौरवात भर टाकते. यावेळी शालेय प्रांगणात काढलेली फुलांची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी मंगळवार दि. 30 जाने. 2018 रोजी स. 10:30 वा. दत्तवाडी शाळेत संपन्न होणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या लेक शिकवा अभियानांतर्गत आदर्श माता पुरस्कार, हळदी-कुंकू समारंभ, बाल आनंद मेळावा आणि विद्यार्थ्यांच्या काव्यसंमेलनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्या. मनोहर इनामदार व उपाध्यापिका पूजा बळे यांनी केले. यावेळी अनिल फिरोदिया, नितीन सोळंकी, निवारा बालगृह जामखेडचे अधीक्षक संतोष गर्जे, हभप युवराज धुमाळ, मा. सरपंच मगन शिंदे, कुंडलिक धुमाळ, विष्णू धुमाळ, सुरेश शिंदे, दिपक शिंदे, सुरेश धुमाळ, गणेश कुमटकर, विष्णू जगदाळे, विकास शिंदे, गजानन राळेभात, अनिल शिंदे, जालिंदर भांडवलकर आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.