Breaking News

पतंग महोत्सवातून भारतीयत्वचा संदेश

सिंधुदुर्गनगरी, दि. 27, जानेवारी - 69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रशाळा कुणकेश्‍वर नंबर 1 या शाळेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त कुणकेश्‍वरच्या समुद्रकिनारी शुक्रवारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आपण सर्व सर्वप्रथम भारतीय आहोत असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. 


सध्या महाराष्ट्रात मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद होत असताना जिल्हा परिषद केंद्रशाळा कुणकेश्‍वर नं. 1 मोठ्या दिमाखात आपल शतक महोत्सवी वर्ष साजरे करित आहे. वर्षभर विविध उपक्रम या निमीत्तान राबविले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी 26 जानेवारी रोजी सकाळी एकच जात, एकच धर्म हा संदेश देण्यासाठी पतंग महोत्सवाच आयोजन करण्यात आले होेते. विरार सिवूड इथले दृष्टी इंटरप्रयजेस आणि केंद्रशाळा कुणकेश्‍वर नंबर 1 यांच्या सयूंक्त विद्यमाने केंद्रशाळा कुणकेश्‍वर नंबर 1 च्या शतक महोत्सवी वर्षाच औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उत्साहान या महोत्सवात सहभाग घेतला.