Breaking News

महाविद्यालयीन युवकांसाठी कॅम्पस् टू कॉर्पोरेट सारख्या कार्यशाळा दिशादर्शक ः गिते

अहमदनगर /प्रतिनिधी :- येथील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील बी.बी.ए. विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पस् टू कॉर्पोरेट या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. एम. व्ही. गिते यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. मंगेश वाघमारे, सायली अनारसे, स्फुर्ती सहारे, डॉ. सतीश जगताप उपस्थित होते.


स्पर्धेच्या युगात कॉलेजमधून कॉर्पोरेट जगतात करिअरची सुरुवात करत असतांना विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्ये, मुलाखत कौशल्ये तसेच शिष्टाचार यासारखी कौशल्ये आवश्यक असून, अशा कार्यशाळेद्वारे त्या विद्यार्थ्यांमध्ये ती विकसित होण्यास मदत मिळणार असून, महाविद्यालयीन युवकांसाठी कॅम्पस टू कॉर्पोरेट सारख्या कार्यशाळा दिशादर्शक ठरतील, असे मत उपप्राचार्य डॉ. एम.व्ही. गिते यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बीबीए विभागप्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी केले. या प्रशिक्षण वर्गानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यु आयोजित करणार असल्याचे डॉ. मंगेश वाघमारे यांनी सांगितले.