शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे : डॉ अंजली तेंडूलकर
पाथर्डी तालूक्यातील करंजी गावातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीची पहाणी करण्यासाठी मंगळवारी सौ तेंडूलकर यांनी करंजी गावाला भेट दिली आहे . तेंडूलकर यांची करंजी गावाला येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापुर्वी देखील तीन महिण्य पुर्वी त्यांनी करंजी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीची पहाणी केली होती आणि त्यावेळी दोनच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला होता. मात्र त्यानंतर जवळपास शंभर शेतकरी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे आल्याने सेंद्रीय शेतीच्या अभ्यासक कलीया चांदमल व मायकल अलेक्स यांनी मावसबहीण असलेल्या डॉ अंजली तेंडूलकर यांना करंजी गावाला पुन्हा एकदा भेट देण्याची विनंती केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी डॉ तेंडूलकर यांनी करंजी गावाला दुसऱ्यांदा भेट दिली .
यावेळी करंजी गावच्या सरपंच नसीम शेख , माजी सरपंच संध्या साखरे , कविता आव्हाड यांनी डॉ तेंडूलकर यांचे स्वागत केले . यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ तेंडूलकर म्हणाल्या की करंजी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेला सेंद्रिय शेतीचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असुन, प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करावी. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असुन, अजून मी सेंद्रिय शेती विषयीची माहीती घेत आहे .
मी लहान मुलांची डॉक्टर असल्याने मला असे जाणवते की, दिवसेंदिवस लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण वाढले असुन त्यांसाठी काय केले पाहीजे? यासाठी देखील मला काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. डॉ अंजली तेंडूलकर यांनी शेतकरी महादेव गाडेकर ,सुरेश क्षेत्रे , सखाराम क्षेत्रे , यांच्या सेंद्रिय शेतीची पहाणी केली . यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रफीक शेख , माजी सरपंच सुनिल साखरे , सुभाषराव अकोलकर , उपसरपंच शरदराव अकोलकर , छगनराव क्षेत्रे , तनवीर शेख , गजानन गायकवाड , जहांगीर मनियार , डॉ मच्छिंद्र गाडेकर , भानूदास अकोलकर , राजेंद्र मुरडे , सचिन अकोलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ शेतकरी यावेळी उपस्थित होते .