Breaking News

बंदुकीचा अवैध कारखाना चालविणार्‍याला अटक

रत्नागिरी वेळंब (ता. गुहागर) येथे अवैधरीत्या बंदूक बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या छाप्यात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


गुहागर तालुक्यातील वेळंबच्या लोहारवाडीत अवैधरीत्या बंदुका बनवल्या जात असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व रिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा छापा टाकला. या छाप्यात बंदुकीच्या नळ्या, ट्रिगर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी रमेश काताळकर याला अटक करण्यात आली आहे.