उद्यानविद्या महाविद्यालयात पुष्प प्रदर्शन; नारायण राणेंनी केले उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी, दि. 27, जानेवारी - उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये आज शुक्रवारी प्रजासत्ताक दिना निमित्त पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून झाले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ज्येष्ठ सिने कलाकार मोहन अगाशे यांनी देखील हजेरी लावली.
प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये दर वर्षी काही ना काही उपक्रम राबविले जातात. त्याच प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राणे यांनी त्यांना झाडांची किती आवड आहे आणि कशा प्रकारे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आपले करियर करू शकतात याची माहिती दिली.या प्रदर्शनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली . विविध प्रकारची आणि जातीची फुल या प्रदर्शनाच आकर्षण वाढवत होती. या पुष्प प्रदर्शनामध्ये फुलांसोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध भाजांच्या कलाकृती ठेवण्यात आले होते.