Breaking News

युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी होणे गरजेचे - पालकमंत्री

नाशिक, दि. 27, जानेवारी - देशात तरुणांची संख्या मोठी असून या युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी होणे गरजेचे आहे. यासाठी एकत्र येऊन व एकसंघ राहून गाव, शहर व देशासाठी कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धा-2017 चा पारितोषिक समारंभ व तक्रारदारांचा मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम महाजन यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. 


महाजन म्हणाले, महाराष्ट्रातून सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवामुळे स्वातंत्र्य लढ्यास बळ मिळाले होते. असे सण साजरे करतांना त्याचे पावित्र्य राखण्याबरोबर सामाजिक संदेश देण्याचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा उत्सव उपक्रमातदेखील शिस्तीचे आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.व्यसनाधीनतेमुळे, तंबाखु, गुटखा आदींच्या सेवनामुळे युवा पिढी कमजोर होण्याची भिती असल्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.