Breaking News

पॉलिसीधारकांना ओळखपत्र कधी देणार ?


शिर्डी/प्रतिनिधी :- शिर्डीत रोजगाराच्या शोधात अनेक तरुण येत असतात. मोफत मिळणारे भोजन मिळेल ते कामामुळे वाढती संख्या त्यातच पॉलिसी करणाऱ्या तरुणांचे प्रमाण किती त्यात स्थानिक किती तालुक्यातील किती, याचा शोध घेतला पाहिजे, अशी भूमिका काही साईभक्तांची होती. तशा तक्रारी ही काहींनी थेट जिल्हापोलीस प्रमुख व जिल्हाधिकार्यांकडे काही भक्तांनी केल्या होत्या. कारण पॉलिसी करण्यासाठी इतर जवळपासच्या चार तालुक्यातून तर मराठवाड्याच्या गंगापूर वैजापूर या भागातील तरुणांचा ही समावेश आहे. यात काही प्रामाणिकही होते. मात्र काहीजण भक्तांना वेठीस धरून फसवणूक करत असल्याचे वेळोवेळी शिर्डी पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अनेक बेरोजगार तरुण साईभक्तांना मार्गदर्शन करून पॉलिसी व्यवसायातून २ पैसे कमवितात. काहींनी स्वार्थासाठी केलेली फसवणूक यामुळे भक्तामध्ये नाराजीची भावना आहे.