ठाण्यात देहविक्री करणा-या तिघांना अटक; चौघे फरार
घोडबंदर रोहवरील शुभम लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग या हॉटेलमधील वेटरच्या मोबाईलवरून फोन करून महिलांना पैशांचे आमिष दाखवून लॉजवर बोलावण्यात आले. त्याच लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी महिलेची मागणी करणा-या ग्राहकांकडून पैसे घेऊन देहविक्री करण्यासाठी पाठवण्यात येत होते. यामध्ये महेश यादव, योगेश शेट्टी व युगेश्वर कुमार उर्फ सुनील यादव या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तर शंकर यादव, जयराम शेट्टी, महेश शेट्टी व राधेश्याम यादव हे फरार आहेत. या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील करत आहेत.